Additional Information
Weight | .21 kg |
---|---|
Dimensions | 13.4 x .7 x 18.7 cm |
₹349.00
हे पहिलं असं पुस्तक आहे जे कसं आणि का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजावते. सोबतच हे जीवनातील सर्वात प्रमुख प्रश्न मेहनत आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन तर कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की एवढ्या मेहनत आणि प्रयत्नांनंतरही जीवन सेट होत नाही. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की एवढी मेहनत आणि प्रयत्न गरजेचे आहेत का? काहीही न करता काहीच मिळवता येऊ शकत नाही का?
याचंच उत्तर देताना हे पुस्तक पहिल्यांदाच ‘डुइंग व हॅपनिंग’ यामागील विज्ञान आणि सायकोलॉजी समजावते. आणि हे समजावणं गरजेचं आहे कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त काही केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी यांनी लिहिलेलं ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ हे पुस्तक ब्रम्हांड आणि जीवनातील अनेक न सांगितलेली रहस्य उलगडत निम्नलिखित गोष्टींमार्फत सायकोलॉजीच्या एका नव्या दुनियेची सफर घडवून देईल.
हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये सर्व प्रमुख बुक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Weight | .21 kg |
---|---|
Dimensions | 13.4 x .7 x 18.7 cm |