101__Marathi

101 SURAS GOSHTI

245.00

Publisher: Aatman Innovations Pvt Ltd

Language:  Marathi

Binding Type: Paperback

Total Pages:  256 pages

ISBN 10: 9384850683

ISBN 13: 978-9384850685

Reading Age: 14 years and above

Item Weight:  295 g

Dimensions: 20 x 14 x 4 cm

Country of Origin: India

499 in stock

SKU: 101-Stories_Marathi Category:

Product Description

‘101 सुरस गोष्टी’ या पुस्तकात त्या सर्वकालीन आणि सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत, ज्या स्पिरिचुअल सायको-डायनॅमिक्सचे पायोनियर तसंच ‘मैं मन हूं’ आणि ‘मैं कृष्ण हूं’ बेस्टसेलर्स पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी यांनी लिहिलेल्या आहेत.

मनुष्यजीवनास अत्यंत सखोलपणे समजून घेणारे आणि समजावूनही देणारे दीप त्रिवेदी यांनी या पुस्तकात गोष्टींच्या द्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल अशा फिलॉसॉफीचा नजराणा पेश केला आहे. अत्यंत सहज-सोप्या भाषेत लिहिलेल्या या सुरस गोष्टी वाचकांना महापुरुष, वैज्ञानिक आणि दार्शनिकांच्या रोमांचक दुनियेच्या सफरीवर घेऊन जातात. या गोष्टींमध्ये मनुष्यजीवनाच्या प्रत्येक पैलूचा समावेश आहे. उदाहरणार्थ प्रेम, क्रोध, लोभ, अहंकार, इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स… ज्यामुळे हे पुस्तक वाचणार्‍यांना फक्त वाचनानंदच मिळणार नाही तर, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलही घडून येईल.

सॉक्रेटिस किंवा रामकृष्ण परमहंसांसारखे दार्शनिक, मुल्ला नसरुद्दीन यांच्या मजेदार गोष्टी, येशू ख्रिस्तांची अनमोल शिकवण असो किंवा वॉल्ट डिज्नी यांचं स्वप्न वा हेलन केलर यांची विजयी जीवनयात्रा… या गोष्टी फक्त सगळ्या वयोगटातल्या मुलांसाठीच प्रेरणादायी आहेत, असं नाही. त्यांचे आई-वडील आणि अगदी शिक्षकांसाठीही या गोष्टी तितक्याच उपयुक्त आहेत. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचं तात्पर्य. ज्यामध्ये दीप त्रिवेदी त्या-त्या गोष्टीतले गहिरे सायकॉलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल पैलू अगदी सरळपणे समजावून देतात, ज्यायोगे ती बाब वाचकांच्या मनात अगदी सहजपणे खोलवर उतरू शकते. त्यायोगे वाचक आयुष्यात यशाची नवी शिखरंही सर करू शकतो.

हे पुस्तक इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीमध्येही उपलब्ध आहे.