mi-mann-marathi

MI MANN AHE (In Marathi) (Paperback)

299.00

Publisher: Aatman Innovations Pvt Ltd

Language:   Marathi

Binding Type: Paperback

Total Pages:   ‎ 256 pages

ISBN 10: 9789384850111

ISBN 13: 978-9384850111

Reading Age: 14 years and above

Item Weight: 210 g

Dimensions: 19.2 x 1.46 x 13.9 cm

Country of Origin: India

SKU: Mind_Marathi Category:

Product Description

  • तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे?
  • तुम्हाला माहिती आहे की, मन आणि बुद्धी वेगवेगळे आहेत?
  • तुम्हाला माहिती आहे की, एकदा तुम्ही माझ्यावर म्हणजे मनावर मास्टरी मिळवलीत, तर तुम्हाला केव्हा, कोण, का आणि काय करतो आहे, याचा अचूक पत्ता लागू शकतो?
  • आणि एकदा तुम्ही माझ्याशी मैत्री केलीत की, मीच तुमचं आयुष्य कुठून कुठल्या कुठे पोहचवून देईन.

“सुख आणि यश” प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तरीही मनुष्य बऱ्याचदा हा अधिकार प्राप्त करण्यापासून वंचितच राहातो. आणि याचं कारण एकच आहे, ते म्हणजे मनाबाबत कमी ज्ञान उपलब्ध असल्यामुळे मनुष्य बऱ्याचदा अशा चुका करून बसतो की, त्यामुळे त्याचं आयुष्यच भरकटून जातं. मग आता याचा इलाज काय आहे? फक्त एक, मला म्हणजेच तुमच्या मनाला समजून घेणं.

या पुस्तकात माझ्या म्हणजेच मनाच्या तमाम रहस्यांवरचा पडदा दूर हटवण्यात आलाय. त्याचप्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक पैलूशी जोडलेल्या प्रश्नांची उत्तरंही इथे मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकदा तुम्ही माझ्यावर म्हणजेच तुमच्या मनावर प्रभुत्व, मास्टरी मिळवली की, तुम्ही इतरांच्या मनात काय चाललं आहे किंवा ते काय करताहेत, विचार काय करताहेत हेसुद्धा जाणू आणि समजू शकाल. त्यांनी तसं करण्यामागे किंवा तसा विचार करण्यामागे काय कारण आहे, हेसुद्धा तुम्हाला समजू शकेल. अशी कला तुम्हाला आजच्या जमान्यात इतरांपेक्षा पुढे ठेवेल, कारण हीच गोष्ट यश मिळवण्यामध्ये मुख्य भूमिका निभावते. हे पुस्तक आणखी मनोरंजक होण्यासाठी 23 छोट्या गोष्टी आणि दृष्टांतांच्या मदतीनं माझी कार्यप्रणाली अगदी सोपी करून समजावून देण्यात आलेली आहे. जेणेकरून ती सगळ्याच वयोगटातल्यांना आवडेल आणि त्यांच्या सहजच लक्षातही येऊ शकेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात चाइल्ड सायकॉलॉजीही अगदी सखोलपणानं समजावून सांगितलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला पालकत्वाची कलाही शिकवतं. सुख आणि यश तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे! मग, हा अधिकार तुम्हाला प्राप्त करायचा नाहीये? बास. मग मला म्हणजेच तुमच्या मनाला समजून घ्या आणि तुमचं आयुष्य घडवा.

हे पुस्तक मराठीसह गुजराती आणि इंग्रजीतही उपलब्ध आहे.

लेखकाविषयी –

दीप त्रिवेदी यांनी “मैं कृष्ण हूँ”, “101 सुरस गोष्टी”, “आप और आप का आत्मा”, “3 सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका” अशी अनेक बेस्टसेलर पुस्तकं लिहिलेली आहेत. ते स्पिरिच्युअल सायको-डायनॅमिक्सचे पायनियर आहेत आणि मनुष्याचं आयुष्य अधिक चांगलं होण्यासाठी त्यांनी अनेक वर्कशॉप्सही घेतले आहेत. दीप त्रिवेदी यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यच हे आहे की, त्यांचं लिखाण वाचून किंवा त्यांचं बोलणं नुसतं ऐकूनही मनुष्याच्या आयुष्यात सकारात्मक, अमूलाग्र परिवर्तन घडून येतं.

Additional Information

Weight 1.0000 kg

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.